अभिनेत्री करीना कपूर खान ही तिच्या लुक्सवर नेहमी काटेकोरपणे लक्ष देत असते. याशिवाय तितकेच महागडे तिचे ड्रेसेस देखील असतात. यावेळी तिने घातलेल्या टॉपची किंमतही अशीच महागडी होती. पाहा तिचे फोटो.
2/ 6
यावेळी करीना तिची बहीण करिश्मा कपूरसोबत बाहेर गेली होती. त्यावेळी त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. करीनाने दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर आता आपल्या कामाला देखील सुरूवात केली आहे.
3/ 6
त्यांच्यासोबत दिग्दर्शक पुनित मल्होत्रा देखील होता. यावेळी करीनाने केशरी रंगाचा टॉप घातला होता. या महागड्या ब्रँडच्या टॉपची किंमत ५१० डॉलर म्हणजेच ३८,६३९ रुपये इतकी आहे.
4/ 6
करीनाचे लुक्स हे नेहमीच हटके आणि लक्षवेधी ठरतात. काही दिवसांपूर्वीच तिने तिचं पुस्तक लाँच केलं होतं. तर या पुस्तकामुळे मोठे विवादही निर्माण झाले होते. प्रेग्नंसी बायबल असं या पुस्तकाचं नाव आहे.
5/ 6
काही दिवसांपूर्वीच करीनाने असाच एक महागडा टॉप घातला होता. त्याची किमंतही ३० हजारांच्या घरात होती.
6/ 6
करीनाने नुकतीच तिच्या कामाला सुरुवात केली आहे. दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर काही काळ ती घरीच वेळ घालवत होती. लवकरच ती आमिर खान सोबत लालसिंग चड्डा या चित्रपटात दिसणार आहे.