सैफ अली खान आणि करिना यांचा मुलगा तैमूर अली खान याच्या जन्मानंतर काही दिवस करिनाने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिचं धडाक्यात पुनरागमनही झालं. आपण पुन्हा एकदा तिने आई व्हायचा निर्णय घेऊ शकतो, असं ती काही मुलाखतींमधून सांगत होती. आता सैफ आणि करीनाने दुसऱ्यांदा ती गोड बातमी शेअर केली आहे.