अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या मैत्रीणींसोबत पार्टी करताना दिसली आहे. पाहा काय होत खास कारण. मंगळवारी संध्याकाळी करीना तिचा मित्र आणि प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्राच्या घरी पार्टीसाठी जाताना दिसली होती. पार्टीत करीनासोबत बहीण करिश्मा कपूर, अभिनेत्री मलायका अरोरा आणि अमृता अरोराही होत्या. करीनाची ही गर्ल्स गँग अनेकदा एकत्र स्पॉट होते. त्या अगदी जवळच्या मैत्रीणी आहेत. हटके ड्रेसमध्ये मलायका पार्टीसाठी आली होती. करिश्माही काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये अगदी सुंदर दिसत होती.