कपूर कुटुंब गेल्या सात दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. या कुटुंबातील कलाकारांनी बॉलिवूडसाठी महत्वाचं योगदान दिलं आहे.
2/ 10
परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल कपूर कुटुंबाची जादू केवळ केवळ बॉलिवूडपूरतीच मर्यादित नाही. तर आता हॉलिवूड सिनेसृष्टीतही कपूर पाहायला मिळत आहे.
3/ 10
आलिया कपूर हे त्यामधील सध्याचं आघाडिचं नाव आहे. लंडनमध्ये राहणारी ही अभिनेत्री सध्या आपल्या ग्लॅमरस फोटोंमधून भारतीयाचं लक्ष वेधून घेत आहे.
4/ 10
आलिया ही दिवंग अभिनेते शशी कपूर यांची नात आहे.
5/ 10
शशी कपूर यांनी जेनिफर केंडल या ब्रिटीश अभिनेत्रीसोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर ते लंडन येथेच स्थायिक झाले. अधूनमधून ते चित्रपटांच्या निमित्तानं भारतात येत असत.
6/ 10
त्यामुळं शशी कपूर यांची पुढची पिढी सध्या ब्रिटीश सिनेसृष्टीत काम करत आहे. व सोबतच कपूर कुटुंबीयांचंही नेतृत्व करत आहेत.
7/ 10
आलिया आपल्या आजोबांप्रमाणे चित्रपटांत काम करत नसली तरी देखील ती एक उत्तम फोटोग्राफर आहे. चित्रपटांच्या पोस्टरसाठी ती कलाकारांचे फोटो काढण्याचं काम करते.
8/ 10
शिवाय प्रायोगिक ब्रिटीश नाटकांमध्येही ती काम करते. तिनं अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आहे. पण तिला केवळ छंद म्हणून अभिनय करायचा आहे.
9/ 10
आलिया भारतात देखील अनेकदा येऊन गेली आहे. अलिकडेच तिनं करीना कपूरचा मुलगा तैमुरच्या वाढदिवसाच्या पार्टीत हजेरी लावली होती. त्यावेळी तिचे फोटो देखील व्हायरल झाले होते.
10/ 10
ती शशी कपूर यांची नात असली तरी भारतीय चाहते मात्र तिला करीना कपूर आणि रणबीर कपूर यांची चुलत बहिण म्हणूनच ओळखतात.