

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईचं महत्व खूप जास्त असतं. पण अनेकदा आई नसल्यास बाबांना आईच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. बॉलिवूडच्या हे अभिनेते बाबासोबत आईची जबाबदारीही सांभाळत आहेत. 'मदर्स डे'च्या निमित्तानं जाणून घेऊयात कोण आहेत हे अभिनेते...


निर्माता करण जोहर सरोगेसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांचा बाबा बनला. यापैकी एक मुलगी आणि एक मुलगा आहे. करणच्या मुलीचं नाव रूही आणि मुलाचं नावं यश आहे. मागील वर्षी मदर्स डेच्या निमित्तानं करणनं, मला मी माझ्या मुलांचा बाबा आणि आई दोन्ही असल्याचा अभिमान आहे असं ट्वीट केलं होतं.


अभिनेता तुषार कपूरनं आतापर्यंत लग्न केलेलं नाही पण तो सिंगल फादर आहे. तुषारही सेरोगेसीच्या माध्यामातून बाबा बनला. त्याच्या मुलाचं नाव लक्ष्य आहे.


बॉलिवूड अभिनेता राहुल बोस त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या समाजकार्यासाठी जास्त ओळखला जातो. त्यानं अंदमान निकोबारमधील 6 मुलांना दत्तक घेतलं आहे. या सर्व मुलांची जबाबदारी राहुल एकटा पार पाडतो.


बॉलिवूडमध्ये अनेकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता राहुल देव खऱ्या आयुष्यात मात्र एक आदर्श पिता आहे. राहुल पत्नी रीनाचं 2009मध्ये कॅन्सरमुळे निधन झालं. राहुल आणि रीनाचा सिद्धांत नावाचा एक मुलगा आहे. रीनाच्या निधनाच्या वेळी सिद्धांत 10 वर्षांचा होता.