दिग्दर्शक करण जोहर नेमका दिग्दर्शनाकडे कसा वळला? याचं उत्तर कदाचित सगळ्यांना माहित आहे. करण जोहरने सुपरहिट ब्लॉकबस्टर दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. आपल्या जवळच्या मित्राच्या अर्थात आदित्य चोप्राच्या दिग्दर्शन पदार्पणात त्याला साथ देत त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री केली आणि याच चित्रपटात अत्यंत लाजाळू आणि भित्र्या रॉकीची भूमिकापण केली
करण जोहरने इंडस्ट्रीला कुछ कुछ होता है सारखा एक आयकॉनिक चित्रपट देत स्वतःचं न पुसलं जाणारं स्थान निर्माण केलं. तब्ब्ल 8 फिल्मफेअर अवॉर्ड, प्रेक्षकांचं तुफान प्रेम, प्यार दोस्ती है.. सारखा डायलॉग, शाहरुख-काजोलची जोडी यासह त्याने राणी मुखर्जी नावाची गुणी आणि त्याकाळात नवखी असलेली अभिनेत्री इंडस्ट्रीला दिली.
केजोचा गाजलेला चॅट शो कॉफी विथ करण बद्दल उल्लेख न करता त्याची लाईफस्टोरी पूर्ण होणं शक्य नाही. या शोने फक्त तरुणाईलाच नाही तर अख्ख्या भारताला वेड लावलं. ग्लॅमरस आयुष्य जगणाऱ्या मोठ्या मोठ्या स्टार्सना कार्यक्रमात बोलवून त्यांच्याशी गप्पा मारणं आणि विशेषतः मसालेदार बातम्या काढणं यामुळे या शो ची क्रेझ वाढली. त्याच्या या कार्यक्रमाला अनेकांनी गॉसिपचं भांडारसुद्धा म्हणलं. पण या शोमध्ये येऊन रॅपिड फायर खेळून हॅम्पर जिंकणं म्हणजे स्टार्सच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण मानला जातो.