कॉमेडियन कपिल शर्माने एका मुलाखतीदरम्यान अल्कोहोल सेवन आणि चिंता याविषयी सांगितले होते. या दोन्ही अडचणींतून बाहेर पडण्यासाठी शाहरुख खानने मदत केल्याचे त्यांनी सांगितले. कपिलने सांगितले होते की, त्याने दारू पिण्यास सुरुवात केली होती, त्यानंतर तो त्याच्या करिअरमध्ये सतत खाली पडत होता. मात्र शाहरुख खानच्या मदतीने तो पुन्हा रुळावर आला.