टीव्हीवर दरवर्षी नवे चेहरे येतात आणि जातात काही इथं टिकून राहतात तर काही मात्र अल्पवधीतच छोट्या पडद्यावरून गायब होतात. पण या गायब झालेल्या चेहऱ्यांमध्ये काही चेहरे असेही असतात जे प्रेक्षकांच्या मनावर आपली वेगळी छाप सोडून जातात.
2/ 8
2009मध्ये सोनी टीव्हीवरील शो कॉमेडी सर्कस मध्ये अशीच एक कलाकार आली होती जिने प्रेक्षकांना खूप हसवलं आणि दमदार कॉमेडीनं ती सर्वत्र लोकप्रिय सुद्धा झाली.
3/ 8
महाराष्ट्रीयन वेशात प्रेक्षकांना हसवणाऱ्या गंगूबाईनं सर्वांच्या मनावर वेगळीच छाप सोडली होती. अवघ्या 7 वर्षाच्या या मुलीनं त्यावेळी सर्वांना अक्षरशः वेड लावलं होतं.
4/ 8
तुम्हाला अजूनही समजत नसेल ना आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत ते? आम्ही सांगतोय ते कॉमेडियन सलोनी डॅनी बद्दल. तिनं वयाच्या 7 व्या वर्षी कॉमेडियन म्हणून टीव्ही डेब्यू केला होता.
5/ 8
सलोनी म्हटल्या सहसा कोणाला आठणार नाही पण गंगूबाई म्हटल्यावर मोठ्या मोठ्या कॉमेडियन्सना टक्कर देणारी ती 7 वर्षांची छोटीशी मुलगी लगेच आठवते. कॉमेडी सर्कस व्यतिरिक्त सलोनीनं इतर अनेक कॉमेडी शोमध्ये काम केलं आहे.
6/ 8
कॉमेडी सर्कसमध्ये तिनं प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मासोबत काम केलं होतं. ती सलोनी आता 18 वर्षांची झाली असून ती एवढी बदलली आहे की, आता तिला ओळखणंही कठीण झालं आहे.
7/ 8
‘कॉमेडी सर्कस महासंग्राम’ मध्ये प्रसिद्धी मिळाल्यानंतर सलोनीनं इक्का दुक्का सीरिअलमध्येही दिसली होती. मात्र यात तिला म्हणावं तसं यश मिळालं नाही. याशिवाय तिनं 2010मध्ये आलेल्या 'नो प्रोब्लम' या सिनेमातही काम केलं होतं.
8/ 8
आपल्या कॉमेडीनं प्रेक्षकांना वेड लावणारी गंगूबाई म्हणजे सलोनी आता सोशल मीडिया क्वीन बनली आहे. पण कॉमेडी शोमध्ये सलोनीच्या परत येण्याची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत.