बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच आपल्या हटके अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेते. कंगनाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेयर केले आहेत. हे फोटो खूपच खास आहेत. या फोटोंमध्ये कंगनाने प्रॉपर साऊथ इंडियन लुक केला आहे. पिवळ्या रंगाच्या कांजीवरम साडीमध्ये कंगना खूपच सुंदर दिसत आहे. इतकच नव्हे तर अभिनेत्रीने केसात गजरादेखील माळला आहे. कंगनाने हा लुक आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केला आहे. लवकरच कंगना आपल्या 'थलाईवी' चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी दिवंगत मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासूनचं सर्वांना या चित्रपटाची मोठी उत्सुकता लागली आहे. 10 सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.