कंगना रणौत (Kangana Ranaut)ने आपल्या भावाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कंगनाने घातलेल्या लहेंग्याची किंमत सुमारे 16 लाख आहे.
|
1/ 9
कंगना रणौतचा (Kangana Ranaut) भाऊ अक्षतचं रितू सांगवान हिच्याशी लग्न झालं आहे. त्यांचं लग्न राजस्थानच्या प्रसिद्ध अशा उदयपूर (Udaipur)शहरामध्ये झालं आहे. या लग्नाला राजस्थानी थीम ठेवण्यात आली होती. अक्षतचं लग्न अगदी धुमधडाक्यात पार पडलं आहे.
2/ 9
कोरोनामुळे अगदी जवळच्या लोकांना लग्नाचं आमंत्रण होतं. उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये त्यांचं लग्न पार पडलं. कंगनाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.
3/ 9
भावाच्या लग्नातही कंगनाचा स्वॅग जबरदस्त होता. जांभळ्या आणि निळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेल्या लहेंग्यामध्ये कंगना अतिशय देखणी दिसत होती.
4/ 9
कंगनाचा लहेंगा शिवायला तब्बल 14 महिने लागले आहेत. अनुराधा वकील यांनी हा लहेंगा बनवला आहे. (Photos- @kanganaranaut/Instagram)
5/ 9
कंगनाने घातलेल्या लहेंग्याची किंमत सुमारे 16 लाख आहे. या कपड्यांमध्ये बॉलिवूडची ही क्वीन खरंच एखाद्या राणीसारखी दिसत होती.
6/ 9
कंगनाने तिच्या लहेंग्यापेक्षा तीन पट किंमतीचे दागिने घातले होते. ‘सब्यसाची’ ब्रँडने तिची ज्वेलरी डिझाईन केली होती. कंगनाने गळ्यात चोकर, एक हार, कानात झुमके आणि बिंदी घातली होती. सूत्रांच्या माहितीनुसार या दागिन्यांची किंमत 45 लाखांच्या घरात आहे.
7/ 9
दागिने आणि महागड्या लहेंग्यावर कंगनाने अगदी साधा मेक-अप केला होता.
8/ 9
अक्षत रणौतच्या लग्नामध्ये सगळ्या पाहुण्यांच्या नजरा कंगनावरच होत्या. मेहंदीच्या वेळी कंगनाने तिच्या कुटुंबासोबत मस्तपैकी डान्सही केला. राजस्थानी थीम असलेल्या लग्नामध्ये राजस्थानची पारंपरिक गाणीही वाजवण्यात आली.
9/ 9
कंगनाने आपल्या भाच्यासोबतचा एक क्यूट फोटोही शेअर केला आहे. अक्षतच्या लग्नामध्ये आलेल्या पाहुण्यांनी रणौत कुटुंबाच्या राजेशाही थाटाचा अनुभव घेतला.