Kalki koechlin Birthday: फ्रान्समध्ये जन्म, भारतात करिअर; लग्नापूर्वीच झाली आई, कल्कीचं adventuresआयुष्य
बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिन आज तिचा 38वा वाढदिवस साजरा करत आहे. लग्नाआधी प्रेग्नंट झालेल्या कल्कीनं आजही लग्न केलेलं नाही. काय आहे यामागचं कारण जाणून घ्या.
बॉलिवूडच्या काही चर्चेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे कल्की कोचलिन.
2/ 12
कल्किनं तिच्या नावानंच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. देव डी सिनेमातून तिनं करिअरला सुरूवात केली. पहिल्याचं सिनेमात तिला प्रसिद्धी मिळाली.
3/ 12
कल्किचे आई वडील फ्रान्सचे. ते भारतात येऊन पॉन्डिचेरीमध्ये स्थित झाले. कल्किचे वडील इंजिनिअर त्यानंतर त्यांनी तमिळनाडूच्या ऊटी येथे ग्लाइडर्स आणि लाइट एअरप्लेन करण्याचा बिझनेस सुरू केला. कल्कीचे आजोबा देखील फ्रान्सच्या प्रसिद्ध एफिल टॉवरचे इंजिनिअर होते.
4/ 12
अभिनेत्री कल्कीला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'शंघाई', 'एक थी डायन', 'ये जवानी है दिवानी' सारख्या सिनेमांमुळे कल्की प्रसिद्ध झाली. 'मार्गरिटा विद अ स्ट्रॉ' सिनेमासाठी कल्कीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
5/ 12
कल्कीला लहानपणापासून संघर्षाचा सामना करावा लागला. तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, वयाच्या 9व्या वर्षीच ती लैंगिक शोषणाची शिकार झाली.
6/ 12
कल्की 15 वर्षांची असताना तिच्या आई वडिलांनी घटस्फोट घेतला. वडिलांनी दुसरं लग्न केलं. कल्कीनं पुढचं आयुष्य आईबरोबर काढलं.
7/ 12
देव डी या तिच्या पहिल्या सिनेमात तिची ओळख डिरेक्टर अनुराग कश्यपबरोबर झाली. दोघांची मैत्री आणि ते प्रेमात पडले.
8/ 12
2011साली दोघांनी लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार वर्ष टिकू शकलं नाही. 2 वर्षांत दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
9/ 12
अनुराग कश्यपला घटस्फोट दिल्यानंतर कल्कीनं पुढे जाण्याचा निर्णय घेतला. कल्की गाय हर्शबर्गला डेट करत होती. 2020मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला.
10/ 12
कल्की ही लग्नाआधीच प्रेग्नंट राहिल्यानं बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. कल्की आणि हर्शबर्ग यांनी आजही लग्न केलेलं नाही.
11/ 12
कल्कीनं प्रेग्नंसीबाबत एका मुलाखतीत सांगितलं होतं की, आम्हाला लग्न करायला काहीच हरकत नाहीये. पण फक्त मी गरोदर आहे म्हणून लग्न करायचं नाही.
12/ 12
आमच्या मुलाच्या शाळेच्या नोंदणीसाठी किंवा आणखी कोणत्या गोष्टीसाठी आमचं लग्न झालेलं आवश्यक असेल तर आम्ही त्याचा विचार करू