दिव्या भारती ही 90च्या दशकात बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. (Kainaat Arora/Instagram)
2/ 10
परंतु यशाच्या शिखरावर असताना वयाच्या 19व्या वर्षी तिचा मृत्यु झाला. तिच्या मृत्यूमुळं बॉलिवूड सिनेसृष्टीला एक मोठा धक्का बसला होता. (Kainaat Arora/Instagram)
3/ 10
दिव्यानंतर तिची बहिण कायनात अरोरा हिनं देखील बॉलिवूडमध्ये आपलं आजमवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात ती अपयशी ठरली. (Kainaat Arora/Instagram)
4/ 10
कायनात ही दिव्याच्या काकाची मुलगी आहे. दिव्यामुळं तिचं करिअर संपलं असा खळबळजनक आरोप तिनं आहे. (Kainaat Arora/Instagram)
5/ 10
अलिकडेच झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत कायनातनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं दिव्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली. (Kainaat Arora/Instagram)
6/ 10
ती म्हणाली, “दिव्याच्या जाण्याचं मला खुप दु:ख आहे. आज जर ती असती तर बॉलिवूडमधील सर्वात मोठी अभिनेत्री असती.” (Kainaat Arora/Instagram)
7/ 10
“परंतु हे देखील सत्य आहे की तिच्यामुळं माझं करिअर संपलं. माझी तुलना कायम दिव्यासोबत केली जाते. मी जेव्हा कधी मुलाखती देते तेव्हा लोक माझ्याऐवजी तिच्याबाबत मला प्रश्न विचारतात.” (Kainaat Arora/Instagram)
8/ 10
“माझ्या महत्वाकांक्षा तिच्या प्रसिद्धीच्या दबावाखाली दडपले गेल्या. जर ती माझी बहिण नसती तर कदाचित आज मी देखील सुपरस्टार अभिनेत्री असते.” (Kainaat Arora/Instagram)
9/ 10
“तुम्ही प्रसिद्ध कलाकाराचे नातेवाईक असाल तर खुप नुकसान होतं असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.” (Kainaat Arora/Instagram)
10/ 10
कायनातनं आतापर्यंत ‘खट्टा मिठ्ठा’, ‘ग्रँड मस्ती’, ‘फरार’, ‘किट्टी पार्टी’, ‘खली बली’ यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु तिचा एकही चित्रपट सुपरहिट झाला नाही. सध्या ती कामाच्या शोधात आहे. (Kainaat Arora/Instagram)