

यावर्षीच्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून आजपासून अर्थात ११ एप्रिलपासून मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकशाहीसाठी मतदानाचा दिवस कोणत्याही सणापेक्षा कमी नसतो. या दिवशी सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सारेच आपला हक्क बजावताना दिसत आहे.


यावेळी हैदराबादमधून काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये ज्यूनिअर एनटीआर आपल्या कुटुंबासोबत मतदान करण्यासाठी रांगेत उभे राहिलेला दिसत आहे.


एनटीआरशिवाय चिरंजीवी आणि रामचरणही मतदान करायला सकाळीच पोलिंग बूथकडे पोहोचले. त्यांनीही सहकुटुंब प्रसारमाध्यमांना फोटो दिले.


जे लोक सुट्टीचा फायदा मिळवत बाहेर फिरण्यासाठी जातात त्यांनी आपला हक्क बजावला पाहिजे हे सांगताना अनेक सेलिब्रिटी दिसतात. लोकांना मतदान करण्यासाठी ते जागरुकही करत आहेत.


यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कलाकारांना सोशल मीडियावर टॅग करून त्यांच्या चाहत्यांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सांगितले.