'जीव झाला येडा पिसा' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे विदुला चौगुले. विदुला आपल्या सुंदर फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. विदुलाने 'जीव झाला येडा पिसा' मालिकेत 'सिद्धी' ही भूमिका साकरली होती. ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडली होती. विदुला ही मूळची कोल्हापूरची आहे. तिचं शालेय शिक्षण सुद्धा कोल्हापुरातचं झालं आहे. विदुलाला जेव्हा 'सिद्धी'ची भूमिका मिळाली त्यावेळी ती अवघ्या 16 वर्षांची होती. मालिका मिळाली तेव्हा सिद्धीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. विदुलाला लहापणापासूनचं अभिनयाची आवड आहे. विदुलाने सगळं कसं शांत शांत, बाप्पा हाजीर हो यांसारख्या नाटकांत अभिनय केला आहे. विदुलाने 'डाग' सारख्या लघुपटातही काम केलं आहे. विदुलाला अभिनयासोबतचं खेळाची देखील आवड आहे. ती एक उत्तम बास्केटबॉल खेळाडू आणि एक उत्तम जलतरणपटू देखील आहे. विदुलाचे आई वडील देखील उत्तम खेळाडू आहेत.