मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Jay Jay SwamiSamarth: आईला वाचवण्यासाठी स्वामींनी दाजीबाला दिलं 'हे' आव्हान; स्वामींची लीला वाचवू शकेल का भक्ताचा जीव?
Jay Jay SwamiSamarth: आईला वाचवण्यासाठी स्वामींनी दाजीबाला दिलं 'हे' आव्हान; स्वामींची लीला वाचवू शकेल का भक्ताचा जीव?
जय जय स्वामी समर्थ मालिकेत सध्या चुकीच्या मार्गावर चालणाऱ्या दाजिबा सरकारच्या आईला स्वामींनी योग्य मार्ग दाखवला आहे. पण आता तिच्या हातात काहीच दिवस राहिले असून स्वामी तिला वाचवू शकतील का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काय घडणार महारविवार च्या भागात पाहा.
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ ही मालिका अवर्जुन पाहिली जाते.
2/ 8
स्वामी समर्थ म्हणजे अर्थात ब्रम्हा विष्णू आणि महेश यांचा अवतार. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांना स्वामींचं दत्तरूप पाहायला मिळालं.
3/ 8
मालिकेनं अल्पावधीच प्रेक्षकांच्या मनावर नाव कोरलं. मालिकेत अभिनेता अक्षय मुदवाडकर यानं स्वामींची मुख्य भूमिका साकारली आहे.
4/ 8
आता जय जय स्वामी समर्थ मालिकेत सध्या चुकीच्या मार्गावर चालणाऱ्या दाजिबा सरकारच्या आईला स्वामींनी योग्य मार्ग दाखवला आहे.
5/ 8
पण आता दाजिबा सरकारच्या आईच्या हातात काहीच दिवस राहिले आहेत. आता तिला वाचवण्यासाठी स्वामींनी दाजिबाला आव्हान दिलं आहे.
6/ 8
आईसरकार काहीच प्रतिक्रिया देत नाहीत तेव्हा दाजिबा स्वामींना तिला जिवंत करायला सांगतो. पण स्वामी त्याला एक आव्हान ते पूर्ण केलं तरच आईचा जीव वाचवू असं म्हणतात.
7/ 8
स्वामीनी दाजिबाला आव्हान दिलंय कि, ''जर तू रेती हातात घट्ट धरू शकलास तर आम्ही आईला जीवनदान देऊ.''
8/ 8
आता दाजीबा स्वामींनी दिलेले आव्हानं पूर्ण करू शकेल का ? आणि त्याला स्वामींचं महात्म्य कळेल का हे महारविवारच्या भागात समजणार आहे.