Jay Jay SwamiSamarth: चेटूकवाला एकनाथ उगारणार का स्वामींवर कुऱ्हाड?; दत्त जयंती विशेष भागात पाहायला मिळणार थरार
जय जय स्वामी समर्थ मालिकेत प्रेक्षकांना दत्तांचा अवतार पाहायला मिळणार आहे. दत्त जयंती विशेष भागात चेटूकवाला एकनाथ आणि स्वामी समर्थ आमने -सामने येणार आहेत.
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ ही मालिका अवर्जुन पाहिली जाते.
2/ 8
मालिकेनं अल्पावधीच प्रेक्षकांच्या मनावर नाव कोरलं. मालिकेत अभिनेता अक्षय मुदवाडकर यानं स्वामींची मुख्य भूमिका साकारली आहे.
3/ 8
स्वामी समर्थ म्हणजे अर्थात ब्रम्हा विष्णू आणि महेश यांचा अवतार.
4/ 8
दत्त जयंती जवळ येत असल्यानं आता जय जय स्वामी समर्थ मालिकेतही प्रेक्षकांना दत्तांचं दर्शन घडणार आहे.
5/ 8
मालिकेच्या दत्त जयंती विशेष भागात आपण पाहणार आहोत की, चेटूकवाला एकनाथ त्याच्या तंत्र मंत्र विद्येच्या मदतीने स्वामी समर्थांना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न करतो.
6/ 8
एकनाथच्या या कृतीवर स्वामींच्या दैवी सामर्थ्यासमोर त्याचे सगळे प्रयत्न अपयशी ठरतात.
7/ 8
एकनाथचा राग अनावर होऊन एकनाथ साक्षात स्वामींवर कुऱ्हाड ऊगारतो, त्याच क्षणी स्वामी त्याला दत्तगुरूंच्या रूपात दर्शन देतात.
8/ 8
सगळ्यांवर ज्याची दहशत आहे तो एकनाथ गुरुंचा स्विकार करुन स्वामींना शरण जाईल का? हे दत्त जयंती विशेष भागात आपल्याला पाहाला मिळणार आहे.