ओळखलं का फोटोतील या चिमुकलीला?आज आपल्या स्माईलने चाहत्यांना करते घायाळ
आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. चाहते त्यांच्या प्रत्येक ठेवून असतात. त्यातल्या त्यात कलाकारांच्या बालपणीचे फोटो पाहायला मिळाले तर ती त्यांच्या चाहत्यांसाठी एक मेजवानीच असते.
|
1/ 8
आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. चाहते त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतात. त्यातल्या त्यात कलाकारांच्या बालपणीचे फोटो पाहायला मिळाले तर ती त्यांच्या चाहत्यांसाठी एक मेजवानीच असते.
2/ 8
अशाच एका अभिनेत्रींचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते हे फोटो पाहून फारच आनंदी होत आहेत.
3/ 8
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि टिक टॉकर जन्नत जुबैरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत.
4/ 8
हे फोटो जन्नत जुबैरच्या बालपणीचे आहेत.यामध्ये ती आपल्या आई-वडीलांसोबत फारच गोड दिसत आहे. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना फारच पसंत पडले आहेत.
5/ 8
जन्नत सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध असली. तरी तिने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तिनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केल्या आहेत.
6/ 8
इमॅजिन या वाहिनीवर आलेली 'काशी' आणि कलर्सवरील 'फुलवा' या मालिका प्रेक्षकांना फारच आवडल्या होत्या. त्यांनतर तिने मुख्य अभिनेत्री म्हणून 'तुही आशिकी' ही मालिका केली होती.
7/ 8
जन्नत जुबैरने मालिकांसोबतच अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलीकडेच ती राणी मुखर्जीसोबत 'हिचकी' या चित्रपटात झळकली होती.
8/ 8
जन्नत जुबैर टिक-टॉकमुळेसुद्धा प्रचंड लोकप्रिय झाली होती. इतक्या कमी वयात तिचे 38.9 मिलियन इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत.