अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच क्रिकेटरच्या रूपात दिसणार आहे. गेल्यावर्षी धर्मा प्रॉडक्शनने जाहीर केलेल्या 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात जान्हवी आणि राजकुमार राव झळकणार आहेत. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटो शेअर करण्यात आले आहेत.