सिनेमात येण्यापूर्वी जान्हवी कपूर फिटनेसकडे जास्त लक्ष देत नव्हती. परंतु हल्ली ती फिट राहण्यासाठी डायट प्लॅनसुद्धा फॉलो करत आहे. जान्हवी काॅर्डिओ आणि वेटलिफ्टिंग करते. सिक्स पॅकसाठी हल्ली ती 5 मिनिटातला जलद व्यायाम करते. जान्हवी कपूर आहाराचीही काळजी घेते. पण तिला खायला आवडतं. ती हिरव्या भाज्या, फळं जास्त खाते. सकाळी उठल्यावर ग्लासभर पाणी पिते. जान्हवी कधीही झोपण्याआधी 3 तास आधी डिनर करते. डिनरला ती भाज्यांचं सूप, उकडलेल्या भाज्या आणि ग्रिल्ड फिश पसंत करते. शूटिंगला असतानाही जान्हवी घरचं जेवण आणते. खूपच बिझी शेड्युल असेल तर जान्हवी भाज्यांचा ज्युस पिते. अभिनेत्री जान्हवी कपूरला जिमचं अॅडिक्शन आहे. ती जिमला जायला एकही दिवस सोडत नाही.