जेना क्रेमर ही हॉलिवूड संगीतसृष्टीतील एक लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते.आय गॉट द बॉय, सर्कल, आय हॅव डन लव्ह, वन द बॉय यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळं लोकप्रिय झालेली जेना सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत आहे.
2/ 10
तिनं अभिनेता माईक कॅसिनसोबत घटस्फोट घेतला आहे. 10 वर्षांच्या संसारातून त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
3/ 10
आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष सेलिब्रिटींसाठी ब्रेकअप, पॅचअप, अफेअर आणि घटस्फोट या गोष्टी सामान्य असतात असं म्हटलं जातं. जगभरातील सेलिब्रिटींबाबत हे प्रकार घडताना आपण सर्रास पाहिलं आहे.
4/ 10
परंतु या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आहे. घटस्फोट मिळवण्यासाठी जेनाला आपल्या पतीला तब्बल 4 कोटी 27 लाख रुपये द्यावे लागले.
5/ 10
कारण लग्नापूर्वी त्यांनी एक घर खरेदी केलं होतं या घराचे अर्धे पैसे माईकनं भरले होते तर अर्धे जेना भारणार होती. दोघांमध्ये तसा कागदोपत्री करार झाला होता.
6/ 10
त्यामुळं या घराचे उर्वरीत पैसे तिनं भरावे शिवाय घरातील फर्निचरसाठी केलेला सर्व खर्च तिनं परत द्यावा या अटीवरच माईकनं तिला घटस्फोट दिला आहे.
7/ 10
माईक आणि जेना यांना दोन मुलं आहे. घटस्फोटानंतर दोन्ही मुलं आई-वडिलांकडे प्रत्येकी सहा महिने राहतील असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
8/ 10
मात्र ज्यावेळी मुलं माईककडे असतील तेव्हा त्यांचा संपूर्ण आर्थिक खर्च जेनानंच करावा अशीही अट माईकनं घातली आहे. याबाबत दोघांमध्ये कायदेशीर करारही झाला आहे. अन् इतक्या अटी मान्य केल्यावर दोघांमध्ये घटस्फोट झाला.
9/ 10
सर्वसाधारणपणे घटस्फोट म्हटला की पुरुषाला महिलेच्या आर्थिक सुरक्षेसाठी काही पैसे द्यावे लागतात. किंवा तिची आर्तिक तजवीज करावी लागते. मात्र या प्रकरणात सर्वकाही अगदी उलट होत आहे.
10/ 10
माईक आणि जेना या दोघांनी प्रेमविवाह केला होता. परंतु मुलं झाल्यानंतर त्यांच्या जबाबदारीवरुन दोघांमध्ये सतत मतभेद व्हायचे. अन् या मतभेदांचं रुपांतर पुढे भांडणात झालं परिणामी त्यांनी घटस्फोट घेतला.