OMG! कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला; सिक्रेट बॉयफ्रेंडबरोबर होणार शिफ्ट?
जॅकलिन या बंगल्यात आपल्या बॉयफ्रेंडसोबत शिफ्ट होणार आहे.
|
1/ 6
आपल्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या आपल्या नव्या घरामुळं प्रचंड चर्चेत आहे.
2/ 6
गेल्या काही महिन्यांपासून जॅकलिन स्वत:साठी एक परफेक्ट घर शोधत होती. अखेर तिला ते घर सापडलं आहे.
3/ 6
जॅकलिननं मुंबईतील जुहू बीचवर एक बंगला खरेदी केला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या आलिशान बंगल्याची किंमत तब्बल 175 कोटी रुपये इतकी आहे.
4/ 6
मीडिया रिपोर्टनुसार जॅकलिन या बंगल्यात आपल्या बॉयफ्रेंडसोबत शिफ्ट होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ती एक व्यवसायिकासोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहात आहे.
5/ 6
हा व्यवसायिका मुळचा चेन्नईचा असून जॅकलिनसाठी आता तो मुंबईत शिफ्ट होणार आहे. येत्या काळात जॅकलिन स्वत:च आपल्या बॉयफ्रेंडचं नाव जाहिर करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
6/ 6
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ती दिग्दर्शक साजिद खानला डेट करत होती. परंतु अंतर्गत मतभेदांमुळं दोघांचं ब्रेकअप झालं होतं.