

अत्यंत आकर्षक दिसणाऱ्या जॅकलिनच्या लवचिकतेचं दर्शनही या फोटोतून होत आहे. बॅलेरिना स्टाईलमधील या फोटोत तिनं एका पायाच्या पुढच्या टोकावर शरीराचा तोल सांभाळत दुसरा पाय स्ट्रेच केला आहे. यावरून तिचा फिटनेस सहज लक्षात येतो. (फोटो सौजन्य - Instagram)


दोन्ही पावलांच्या पुढील टोकावर आणि दोन्ही हातांच्या तळव्यांवर शरीराचा तोल सावरणारी जॅकलिन यात विलक्षण सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टी कुंद्रा हिनंही उफ! लुक अॅट यु गर्ल, अमेझ! अशी कमेंट केली आहे, तर यामी गौतमीनं अमेझिंग अशी कमेंट केली आहे. (फोटो सौजन्य - Instagram)


या फोटोत तिने दोन्ही पाय गुडघ्यातून वळवून मागे नेले आहेत आणि शरीराची कमान करून तिनं दिलेली ही पोझ दिलखेचक आहे. जॅकलिनच्या नव्या प्रोजेक्टची ही तयारी दिसत आहे. (फोटो सौजन्य - Instagram)


या फोटोतही जॅकलिन अतिशय सुंदर दिसत असून चाहत्यांना घायाळ केलं आहे. शी रॉक्स लाईफ असं कॅप्शन असलेल्या फोटोवरून हा डान्स किंवा फिटनेस इनिशिएटीव्ह दिसत आहे. (फोटो सौजन्य - Instagram)


एका घोड्याला धरून खळखळून हसणारी जॅकलिन. एका आउट डोअर शूटिंग दरम्यानचा हा फोटो आहे. जॅकलिनचं घोड्यांबद्दलचं प्रेम सर्वश्रुत आहे. त्याचीच प्रचीती इथं येत आहे. (फोटो सौजन्य - Instagram)


या फोटोत जॅकलिन स्कीईंग करताना दिसत आहे. दूरवर पसरलेल्या पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या मैदानावर जॅकलिन स्कीईंगचा आनंद घेता आहे. (फोटो सौजन्य - Instagram)


एका चित्रपटातील गाण्याचे दृश्य असणारा हा फोटो असून यात जॅकलिन बारवर डान्स करताना दिसत आहे. ती एक उत्तम डान्सर आहे. (फोटो सौजन्य - Instagram)


जॅकलिनचा व्यायाम करतानाचा हा फोटो ती किती फिटनेसप्रेमी आहे, हे स्पष्ट करतो. सुंदर सजवलेल्या तिच्या खोलीच्या पार्श्वभूमीवर व्यायाम करतानाचा तिचा हा फोटो अनेकांना व्यायामाची प्रेरणा देणारा आहे. (Image: Instagram)


जॅकलिन केवळ उत्तम डान्सर, अभिनेत्री नाही तर तिला अनेक कलांची आवड आहे. तिला पेंटिंग्ज करायलाही आवडतात. या फोटोत ती निसर्गाच्या सान्निध्यात पेटिंग करताना रमून गेलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य - Instagram)