जॅकलिन फर्नांडिस ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. फारच कमी वेळेत जॅकलिनने आपली खास ओळख बनवली आहे. तरुणाईमध्ये अभिनेत्रीची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. आपली स्टाईल आणि मजेशीर स्वभाव यामुळे जॅकलिन नेहमीच चर्चेत असते. अनेक बिग बजेट चित्रपट आणि जाहिरातींमध्ये झळकलेल्या जॅकलिनचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरसुद्धा जॅकलिन प्रचंड चर्चेत असते. सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. म्हणून अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तब्बल 60 मिलियनचा टप्पा गाठला आहे. अभिनेत्रीने नुकतंच याचा आनंद साजरा करत जंगी सेलिब्रेशनदेखील केलं आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये जॅकलिन फर्नांडिस फारच उत्साहात केक कट करताना दिसून येत आहे.