

मुळ श्रीलंका या देशाची असलेल्या जॅकलिन फर्नांडिसने खुप कमी दिवसांत बॉलिवूडमध्ये खुप मोठं नाव केलं आहे. तिने आपल्या अभिनय आणि लुक्सच्या जोरावर चाहत्यांना मोहिनी घातली आहे. (फोटो साभार- इन्स्टाग्राम jacquelinef143)


लोकं तिच्या सौंदर्यावर आणि नजाकतीवर फिदा आहेत. यामुळेच तिला इंस्टाग्रामवर 47.5 दशलक्ष लोकं फॉलो करतात, यावरून चाहत्यांमध्ये असलेली प्रसिद्धी लक्षात येऊ शकते. (फोटो साभार- इन्स्टाग्राम jacquelinef143)


जॅकलिनने पोस्ट केलेला हा मॉर्निंग सेल्फी खूप व्हायरल झाला आहे (फोटो साभार- इन्स्टाग्राम jacquelinef143)


हे दोन फोटो पोस्ट करताना जॅकलिनने असं लिहिलं की- आज प्रत्येकाचा दिवस चांगला जावो! सर्वजण निरोगी आणि आनंदी रहा! जॅकलीनच्या या फोटोला लाखो लोकांनी पसंत केलं आहे. तसेच अनेक बॉलीवूड कलाकारांसोबतच चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. (फोटो साभार- इन्स्टाग्राम jacquelinef143)


काही दिवसांपूर्वी जॅकलिनने बॅले डान्सच्या पोजमधले काही फोटो तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर पोस्ट केले होते, या फोटोंत ती खूपच हॉट दिसत होती. (फोटो साभार- इन्स्टाग्राम jacquelinef143)


गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जॅकलिनने तिचा जीममधला हा फोटो पोस्ट केला होता. हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. (फोटो साभार- इन्स्टाग्राम jacquelinef143)


गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जॅकलिनने हा टॉपलेस फोटो पोस्ट केला होता. अनेकांनी हा फोटो पसंत केला होता. या फोटोला 20 लाखाहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. (फोटो साभार- इन्स्टाग्राम jacquelinef143)


जॅकलिन तिच्या ग्लॅमरस आणि हॉट अंदाजाने प्रेक्षकांना वेड लावते. तिचा हॉट अंदाज मर्डर -2, हाऊसफुल -2, किक, जुडवा -2 अशा अनेक चित्रपटांत दिसला आहे. (फोटो साभार- इन्स्टाग्राम jacquelinef143)


2021 हे साल जॅकलिनसाठी खूप व्यस्त असणार आहे. ती सलमान खानबरोबर राधे चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तिने भूत पोलीस आणि बच्चन पांडे या चित्रपटांच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे. तसेच ती रणवीर सिंगसोबत सर्कसमध्येही झळकणार असून सलमानबरोबर किक -2 मध्येही पुन्हा धमाका करणार आहे. (फोटो साभार- इन्स्टाग्राम jacquelinef143)