दिशा पाटनी सून म्हणून तुम्हाला चालेल का? टायगरच्या रिलेशनशिपवर जॅकी श्रॉफ यांनी सोडलं मौन
टायगर श्रॉफ दिशा पटानीसोबत लग्न करणार का? जॅकी श्रॉफ म्हणाले...
|
1/ 5
दिशा पटानी ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चित्रपटांसोबतच ती आपल्या खासगी आयुष्यामुळं देखील चर्चेत असते. सध्या ती अभिनेता टायगर श्रॉफला डेट करत असल्याची चर्चा आहे.
2/ 5
टायगर आणि दिशा दोघंही लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची चर्चा आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. इतकंच काय तर टायगरच्या फॅमेली फोटोंमध्ये देखील ती अनेकदा झळकते. यावर आता स्वत: जॅकी श्रॉफ यांनी उत्तर दिलं.
3/ 5
टायगर दिशासोबत लग्न करणार आहे का? ती सून म्हणून तुम्हाला पसंत आहे का? असे प्रश्न टायगरचे वडील जॅकी यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विचारण्यात आले. यावर त्यांनी देखील आढेवेढे न घेता दिलखुलास उत्तर दिलं.
4/ 5
ते म्हणाले, “टायगर 25 वर्षांचा असल्यापासून डेटींग करतोय. मी त्याला त्याच्या आयुष्यातील निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. यापुढे त्यांनी स्वत:च्या भविष्याबाबत काय विचार केलाय अद्याप माहित नाही.”
5/ 5
“पण टायगरनं स्वत:चं पूर्ण लक्ष सध्या आपल्या कामावरच केंद्रित केलं आहे. त्याला एक उत्तम अभिनेता व्हायचं आहे. त्यासाठी तो प्रयत्न करतोय. त्यामुळं लग्न वगैरे या गोष्टीचा विचार त्यानं अद्याप असेल असं मला वाटत नाही.” असं उत्तर जॅकी श्रॉफ यांनी दिलं.