Birthday Special: फिल्म इंडस्ट्रीसाठी नाव बदललं, घरातून पैसे चोरुन पळूनही आली होती राखी सावंत
अभिनेत्री, ड्रामा क्वीन, आयटमर्म गर्ल अशी अनेक बिरुदं मिरवणाऱ्या राखी सावंतचा (Rakhi Sawant) आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आयुष्यातल्या टर्न आणि ट्विस्टचा घेतलेला मागोवा.


बोल्ड, आयटम गर्ल आणि सतत कोणत्यातरी वादांमध्ये अडकणारी बॉलिवूडची एक अभिनेत्री म्हणजे राखी सावंत (Rakhi Sawant). या बिनधास्त अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. राखीचा जन्म 25 नोव्हेंबर 1978 मध्ये मुंबईत झाला होता.


चित्रपट सृष्टीमध्ये एवढा मोठा पल्ला गाठणं राखीसाठी सोपी गोष्ट नव्हती. राखीचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. तर आई हॉस्पिटलमध्ये आया होती. त्यांच्या घरातली परिस्थिती अतिशय गरिबीची होती.


लहानपणापासूनच राखीला डान्सची फार आवड होती. पण तिची नाचण्याची आवड तिच्या घरी अजिबात पसंत नव्हती. एका मुलाखतीमध्ये बोलताना राखीने सांगितं, ‘मी डान्स करायचे तेव्हा मला माझे मामा अक्षरक्ष: मारायचे.’


आर्थिक तंगी असल्यामुळे राखीने पडेल ते काम केलं आहे. लग्नामध्ये वाढप्याचं कामही तिला करावं लागलं होतं.


अभिनेत्री होण्यासाठी तिने घरातल्या पैशांची चोरी करुन पळ काढला होता. घरच्या लोकांशी सगळे संबंध तोडून तिने सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. पण काम मिळवण्यासाठी तिला प्रचंड स्ट्रगल करावं लागलं.


अग्निचक्र या सिनेमामधून राखीने सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं. राखीचं खरं नाव नीरु असं आहे. चित्रपटसृष्टीत येताना तिने राखी सावंत हे नाव स्वीकारलं. 'जोरू का गुलाम', ' जिस देस में गंगा रहता है', 'ये रास्ते अशा सिनेमांमध्ये राखीने काम केलं आहे.


राखी सावंतला मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका मिळत नव्हत्या. पण 2005 मध्ये 'परदेसिया' या गाण्यामध्ये ती झळकली आणि तिला एखाद्या अभिनेत्रीपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली.


प्रेमाच्या बाबतीत मात्र राखी यशस्वी ठरली नाही. अभिषेक अवस्थीसोबत तिचे प्रेमसंबंध जगजाहीर होते. त्यांनी ‘नच बलिये’ या शोमध्ये एकत्र कामही केलं होतं. दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. पण त्याआधीच त्यांचं नातं तुटलं.


‘राखी का स्वयंवर’ या शोमध्येही ती पतीच्या शोधात असताना अनेकांशी रोमान्स करताना दिसली पण तिथेही तिचं सूत कोणाशी जुळलं नाही. मिका सिंगसोबतची तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.