इसाबेल कैफ कॅटरिना कैफची सर्वात धाकटी बहीण आहे आणि ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. कॅटरिना कैफ सारखेच इसाबेलला सुद्धा सलमान खान बॉलिवूडमध्ये लाँच कारणार आहे. सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा सोबत इसाबेलचा पहिला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कॅटरिना कैफने एका मुलाखतीत असे सांगितले होते की तिची बहीण अभिनयाबद्दल खूप महत्वाकांक्षी आहे. इसाबेलचं ली स्ट्रासबर्ग येथे चार वर्ष शिक्षण झाले आहे. इसाबेलला खास करून डान्सची आवड आहे. 20 नोव्हेंबरला इसाबेल कैफने तिचे पहिले गाणे रिलीज केले. 'माशल्लाह' असे शीर्षक असलेले या म्युझिक व्हिडिओमध्ये इसाबेल खूपच सुंदर दिसत आहे. इसाबेलने वयाच्या 14 व्या वर्षी एक मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये कॅटरिना कैफच्या यशामुळे इसाबेलला अभिनय करण्यास प्रेरणा मिळाली