'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील सर्वच भूमिका अनोख्या असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून या शोने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. शोमध्ये प्रत्येकाच्या भूमिकेची एक वेगळी, खास ओळख बनली आहे. परंतु यात 'दयाबेन' हे असं कॅरेक्टर आहे, ज्याच्या अनोख्या डायलॉग डिलिव्हरीमुळे हे पात्र घरा-घरांत पोहचलं. 'दयाबेन'ची भूमिका साकारणारी दिशा वकानी पुन्हा शोमध्ये एन्ट्री करणार की नाही, याबाबत मोठी चर्चा आहे. (फोटो सौजन्य: dishavakanioffcal: /Instagram)
दिशा वकानीने 2017 मध्ये मॅटर्निटी लिव्हसाठी शोमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती अद्यापही शोमध्ये आलेली नाही. 'हे मां माताजी', 'टप्पू के पापा' हे डायलॉग अनोख्या पद्धतीने बोलून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या दिशा वकानीच्या शोमधील एन्ट्रीबाबत अनेक प्रेक्षकांकडून विचारणा होत आहे. (फोटो सौजन्य: dishavakanioffcal: /Instagram)