तब्बल १७ वर्षांनी फरहान अख्तर आणि अधुना भवानी यांचा गेल्या वर्षी घटस्फोट झाला आहे. त्यानंतर त्या दोघांची अनेकांसोबत नावं जोडली गेली.
2/ 5
असं म्हटलं जात होतं की घटस्फोटानंतर फरहान आणि श्रद्धा कपूर हे दोघे काही काळ रिलेशनशिप होते.
3/ 5
पण आता अजून एका अभिनेत्रीसोबत त्याचे नाव जोडले गेले आहे. ती म्हणजे मराठमोळी अभिनेत्री शिबानी दांडेकर. नुकताच प्रदर्शित झालेला भावेश जोशी या चित्रपटात शिबानीने अर्जुन कपूरसोबत एक आइटम नंबर केला आहे.
4/ 5
फरहान आणि शिबानी हे दोघे २०१५पासून एकमेकांना ओळखतात. त्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी एकत्र पाहिलं गेलंय. शिबानी ही प्रसिद्ध वीजे आणि अँकर अनुषा दांडेकरची बहीण आहे.
5/ 5
अधुना तिच्या घटस्फोटानंतर डिनो मोरीयाचा भाऊ निकोल मोरीयासोबत असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. तर श्रद्धा आणि फरहान विभक्त झाल्यानंतर श्रद्धा एका फोटोग्राफरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.