

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इरफान खाननं सर्वांचा निरोप घेतला. न्यूरोइंडोक्राइन या कॅन्सरनं तो मागच्या 2 वर्षांपासून आजारी होता. 2018 मध्ये त्याला या कॅन्सरचं निदान झालं होतं.


कॅन्सरमुळे निधन झालेला इरफान खान हा पहिलाच अभिनेता नाही. कॅन्सरमुळे बॉलिवूडनं या आधीही बरेच कलाकार गमावले आहेत.


2017 मध्ये दिग्गज अभिनेता विनोद खन्ना यांचं वयाच्या 70 व्या वर्षी निधन झालं होतं. विनोद खन्ना यांना ब्लड कॅन्सर होता. ज्यामुळे ते बराच काळ रुग्णालयात उपचार घेत होते.


1981 मध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना पॅनक्रियाटिक कॅन्सर होता. ज्यामुळे त्या बराच काळ हॉस्पिटलमध्ये होत्या.


एकेकाळचे बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना सुद्धा कॅन्सरची लढाई हारले होते. बराच काळ कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये आपल्या घरीच अखेरचा श्वास घेतला होता.


बॉलिवूड अभिनेता फिरोज खान यांचंही कॅन्सरमुळेच निधन झालं होतं. 2009 मध्ये वयाच्या 69 व्या वर्षी त्यांचं कॅन्सरमुळे निधन झालं होतं.