1/9 इरफान पठाणने(Irfan Pathan) मागील वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यानंतर आता तो चित्रपटांमध्ये आपलं नशीब आजमावू पाहत आहेत. यामध्ये कोबरा (Cobra) नावाच्या दाक्षिणात्य चित्रपटातून इरफान पठाण आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात करणार आहे. या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला असून याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. याआधी अनेक क्रिकेट खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर चित्रपटांमध्ये आपलं नशीब आजमावलं होतं. यामध्ये काही खेळाडूंना यश आलं तर काही खेळाडूंना अपयश आलं. आम्ही तुम्हाला अशाच काही क्रिकेटपटूंची माहिती सांगणार आहोत.
2/ 10 या चित्रपटामध्ये इरफान पठाण (Irfan Pathan) तुर्कस्तानच्या इंटरपोल अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. यामध्ये चियान विक्रम (Vikram) हा मुख्य भूमिकेत दिसणार असून यामध्ये तो गणिततज्ज्ञाची भूमिका साकारत आहे. याचबरोबर श्रीनिधी शेट्टी, केएस रविकुमार, मिया जॉर्ज आणि मृणालिनी रवी यांच्या देखील भूमिका आहेत. संगीतकार ए. आर. रहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिलं असून अजय गनामुत्थु यांनी दिग्दर्शित केला आहे.
5/ 9 युवराज सिंग (Yuvraj Singh) याचे वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनीदेखील क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेक चित्रपटांत काम केलं आहे. अनेक बॉलिवूड आणि पंजाबी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे . सुपरहिट ठरलेल्या भाग मिल्खा भाग(Bhaag Milkha Bhaag) या चित्रपटात त्यांनी फरहान अख्तरच्या कोचची भूमिका स्वीकारली होती. फोटो साभार- ट्विटर
6/ 9 फार मोठी क्रिकेट कारकीर्द नसलेल्या विनोद कांबळीने (Vinod Kambli) देखील निवृत्तीनंतर विविध चित्रपटांत काम केलं आहे. अनर्थ या बॉलिवूड चित्रपटाबरोबरच बेट्टानगारे या कन्नड चित्रपटात देखील त्यानं काम केलं आहे. पल पल दिल के पास(Pal Pal Dil Ke Paas) या हिंदी चित्रपटात देखील त्यानं काम केलं आहे. फोटो साभार @vinodkambli2016/Instagram
8/ 9 भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कपिल देव (Kapil Dev) यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. इकबाल आणि मुझसे शादी करोगी या चित्रपटात त्यांनी कॅमिओ रोल केला आहे. लवकरच 1983 च्या क्रिकेट वर्ल्डकपवर 83 हा चित्रपट येत असून यामध्ये रणवीर सिंग(Ranveer Singh) कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.