

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या मुलीचा आज 21 वा वाढदिवस. आमिरनं इराच्या 21व्या वाढदिवसाला त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या लहानपणीचा एक फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या. (फोटो- इन्स्टाग्राम)


पण इराच्या आयुष्यात अजून एक अशी खास व्यक्ती आहे ज्या व्यक्तीनंही तिच्यासोबत काही स्पेशल फोटो शेअर करत इराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो- इन्स्टाग्राम)


मिशाल कृपलानी असं या मुलाचं नाव असून यासोबतचे इराचे फोटो पाहाता. हा मुलगा इराचा बॉयफ्रेंड असल्याच्या चर्चांनी सध्या सोशल मीडियावर जोर धरला आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)


सोशल मीडियावरील या सर्व फोटोंतील इरा आणि मिशाल यांचं बॉन्डिग पाहिल्यावर आता मिशाल मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा जावई होणार का असा चर्चा सगळीकडे सुरु झाली आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)


मिशाल कृपलानी हा एक सिंगर असून त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या म्यूझिकचे अनेक व्हिडिओ आहेत आणि यातील जवळजवळ प्रत्येक व्हिडिओला इरानं लाइक केलेलं आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)


काही दिवसांपूर्वी इरानं 'आशा करते, तुझी वसंतातील सुट्टी ऊन आणि हास्याने परिपूर्ण राहिली असेल' असं कॅप्शन देत मिशालसोबत एक फोटो शेअर केला होता. (फोटो- इन्स्टाग्राम)


मिशाल आणि इराच्या सोशल मीडिया अकाउंटवरील सर्वच फोटोंमध्ये त्यांच्यातील स्पेशल बॉन्डिग दिसत आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)