इंडियन प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा 31मार्चला पार पडणार आहे. यंदाची IPLओपनिंग सेरमनी दणक्यात होणार आहे. साऊथच्या दोन बड्या अभिनेत्री त्यांच्या दमदार गाण्यांवर थिरकताना दिसणार आहेत. पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना ऊ अंटावा या गाण्यावर दणकूण नाचताना दिसणार आहे. संपूर्ण देशभरातील प्रेक्षक जिचे फॅन्स आहेत पण त्या रश्मिकाला कोणता क्रिकेटर आवडतो याचं सिक्रेट तिनं सांगितलं. IPL ओपनिंग सेरमनीमध्ये परफॉरमन्स सादर करण्यासाठी रश्मिका खूपच उत्साही आहे. IPL पेजवरून रश्मिका आणि तमन्ना भाटीयाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला ज्यात दोघींचा प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. रश्मिकाबरोबर बॉलिवूड सिंगर अरजीत सिंग देखील परफॉरमन्स देणार आहे. तुझा आवडता क्रिकेटर कोणता असा प्रश्न रश्मिकाला विचारण्यात आला तेव्हा तिनं एमएस धोनी आणि विराट कोहली यांचं नाव घेतलं. रश्मिका प्रमाणेच अभिनेत्री तम्मना भाटियाला देखील एमएस धोनी आणि विराट कोहली हे दोन क्रिकेटर आवडतात.