

प्रिया प्रकाश वारियरचा मल्याळी चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच सीनमध्ये प्रियाने जसा डोळा मारला आहे तसाच सेम टू सेम मांजरीनं डोळा मारल्याचं या फोटोत पाहायला मिळतं आहे.


'चेतना-आपका फ्रेंडली अंकल' नावानं एक ट्विटर अकाउंट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. या अकाऊंटवरून फिल्मस्टार्सची नक्कल करणारे मांजरींचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.


हा फोटो पाहून तर तुम्हाला हसू आवरणार नाही. रजनीकांत यांची सिगरेट ओढण्याची ही स्टाईल या मांजरीनं हुबेहुब आजमावली आहे.


चेतना रजनीकांत यांचे फॅन असावेत असा अंदाज आहे कारण रजनीकांत यांच्या केसांची स्टाईल मांजरीच्या फोटोवर एडिट केली आहे. हा मांजरीचा हटके लूक पाहा


कमल हसन आणि या फोटोतील मांजरीच्या मिशा पाहा. आलं ना तुम्हालाही हसू. कुणी कुणाला कॉपी केलं आहे हे यामध्ये सांगणं कठीण आहे. मात्र दोघांच्या मिशांची स्टाईल मात्र एकसारखी आहे.


बाहुबलीमधील प्रसिद्ध स्टार प्रभासची स्टाईल या मांजरीनं केली आहे. नेटकऱ्यांनी मांजरीच्या या स्टाईलवर लाईकचा पाऊस पाडला आहे.


फक्त फिल्म स्टार्सचीच नाही तर प्रत्येक मांजराची एक वेगळी स्टाईल असते. हे या फोटोत पाहायला मिळत आहे.