International Cat Day : मांजरवेड्या अभिनेत्रींचं हे प्रेम पाहून व्हाल थक्क!
बॉलिवूडमध्ये आणि मराठीतही अनेक अभिनेत्री मार्जारप्रेमी आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या मांजरींच्या एकाहून एक सुरस कथाही आहेत. मनीमाऊच्या प्रेमात असणाऱ्या या अभिनेत्रींचे हे गोड फोटो International Cat Day च्या निमित्ताने....


बॉलिवूडमध्ये आणि मराठीतही अनेक अभिनेत्री मार्जारप्रेमी आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या मांजरींच्या एकाहून एक सुरस कथाही आहेत.


अनेक बॉलिवूड अभिनेत्री मनीमाऊच्या प्रेमात आहेत. नव्या दमाची अभिनेत्री आणि चर्चेत असलेल्या दिशा पाटनीची ही मांजर.


मूळच्या श्रीलंकन वंशाच्या या अभिनेत्रीचं मार्जारप्रेम सर्वश्रुत आहे. तिच्याकडचं परकीय ब्रीडचं हे मांजर सोशल मीडियावरसुद्धा लोकप्रिय आहे. (फोटो - Instagram)


मराठी अभिनेत्रींपैकी रेशम टिपणीसला मांजर फार आवडतं. एक टप्पा आऊटमध्ये परीक्षक म्हणून दिसणाऱ्या रेशमचे मनीमाऊबरोबरच फोटो सोशल मीडियावर नेहमी दिसतात. (फोटो - Instagram)


लोकप्रिय मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वेकडे पर्शियन कॅट आहे. मुक्ताने त्याचं नाव झेंडू असं ठेवलंय. (फोटो Instagram)


मांजरप्रेमी अभिनेत्रींमध्ये मुक्ता बर्वेचा नंबर वरचा लागतो. ती या मांजरांचे वाढदिवसही झोकात साजरे करते. (फोटो - Instagram)


बिग बॉसनंतर सध्या वर्तुळ मालिकेमुळे चर्चेत असणाऱ्या जुई गडकरीकडे चार मांजरं आहेत. (फोटो - Instagram)