१८ जुलैला अभिनेत्री प्रियंका चोप्राने ३९वा वाढदिवस साजरा केला. सध्या प्रियंका लंडनमध्ये आहे. तिथेच तिने तिच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं होतं. सुंदर केकसोबत फोटो शेअर तिने केला आहे. प्रियंकाने पूलसाइड बर्थडे पार्टी केली होती. तर निकने हा सगळा तामझाम केला होता. दरम्यान निक सध्या अमेरिकेत आहे. तो उपस्थित नव्हता पण त्याने सगळी व्यवस्था केली होती. प्रियंकाने वाढदिवस झाल्यानंतर तिने सगळे फोटो शेअर केले होते. बिकीनीत प्रियंका अतिशय बोल्ड दिसत आहे. प्रियंकाचा पूलसाईड बर्थडे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. प्रियंका तिच्या नव्या वेबसीरिजच्या शुटींगसाठी लंडनमध्येच आहे.