आज वर्ल्डकप 2019 चा भारत विरूद्ध पाकिस्तान सामना असल्यानं सगळीकडे देशभक्तीला उधाण आल्याचं चित्र आहे. दोन्ही देशांकडून आपापल्या संघांना जोरदार पाठिंबा दिला जात आहे. दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज पुन्हा एकदा क्रिकेट युद्ध पाहायला मिळत आहे. त्यानिमित्त जाणून घेऊयात बॉलिवूडच्या त्या हिरोंविषयी ज्यांनी त्यांच्या सुपरहिट सिनेमांमधून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवला...
जेपी दत्ता दिग्दर्शित 2003साली आलेल्या ‘LOC कारगील’ या सिनेमात अभिनेता संजय दत्तनं लेफ्टनंट कर्नल व्हाय. के. जोशी यांची भूमिका साकारली होती. भारतीय सेनेवर आधारित या सिनेमा प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यात यशस्वी ठरला होता. हा एक मल्टी स्टारर सिनेमा होता मात्र या सिनेमात संजय दत्तची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली.