सध्याच्या कोरोनाच्या काळात आर्थिक मदती इतकीच रक्त आणि प्लाझ्माची अत्यंत गरज आहे. तर काही सेलिब्रिटींनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मराठी अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत ने नुकताच प्लाझ्मा दान केला आहे. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. प्लाझ्मा दान करण्यासोबतच तिने इतरांनाही प्लाझ्मा दान करण्यासाठी आवाहन केलं आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरनेही आता प्लाझ्मा दान केला आहे. तर इतरांनाही प्लाझ्मा दान करण्यासाठी आवाहन केलं आहे. अभिनेत्री झोया मोरानी ने देखिल कोरोनामुक्त झाल्यानंतर प्लाझ्मा दान केला आहे. अभिनेता गुरमीत चौधरी आणि पत्नी अभिनेत्री देबिना बॅनर्जी यांनीही कोरोना मुक्त झाल्यानंतर प्लाझ्मा दान केला आहे. ऑस्कर विजेता अभिनेता टॉम हंक्स यानेही प्लाझ्मा दान केला आहे.