अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तुर्कीत वेळ घालवत आहे. तिचे फोटो पाहून चाहतेही तिला अनेक कमेंट्स देत आहेत. परिणीतीने तिच्या व्हेकेशनचे अनेक फोटो शेअर केले आहेत. परिणीती तुर्कीत सुट्यांचा आनंद घेत आहे. गेले अनेक दिवस लॉकडाउनमुळे शुटींग बंद होतं. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी हे व्हेकेशनसाठी बाहेर गेले होते. यासोबतच परिणीती सध्या फिटनेस फ्रिक बनली आहे. तिने तिच बरचसं वजन काही काळात घटवलं आहे. त्यामुळे तिचा फिटनेस पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. सध्या ती सोशल मीडियावर फार सक्रिय असून अनेक फोटो शेअर करत आहे. सनकिस (Sunkissed) फोटोत ती अतिशय सुंदर दिसत आहे.