

वरुण आणि नताशाच्या लग्नासाठी अलिबागमधील एक हॉटेल बुक करण्यात आलं आहे. दोघांचं लग्न पंजाबी पद्धतीने होणार आहे. पिंकविलाच्या बातमीनुसार यामध्ये 200 लोकांची उपस्थिती असणार आहे.


वरुण-नताशा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेक खास प्रसंगात दोघे एकत्र देखील दिसले आहेत. या कपलचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत (फोटो सौजन्य-@varundvn/Instagram)


कॉफी विथ करण सीझन 6 मध्ये वरुणने तो नताशाला डेट करत असल्याचं सांगितलं होतं. त्याने यावेळीच संकेत देखील दिले होते की तो लवकरच लग्न करणार आहे. नताशा शाळेपासूनच खूप सपोर्टिव्ह असल्याचं वरुण म्हणतो. (फोटो सौजन्य-@varundvn/Instagram)


वरुणच्या सुरुवातीच्या करिअरमधील काळात त्याने नताशाबरोबरच्या नात्याचा खुलासा केला नव्हता. (फोटो सौजन्य-@varundvn/Instagram)


वरुण धवनने अलीकडेच फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं- असं होऊ शकतं की नताशाबरोबच नातं 2021 मध्ये नेक्स्ट लेव्हलवर घेऊन जावू शकतो. गेल्या 2 वर्षापासून अनेकजण त्याच्या लग्नाबाबत बोलत आहेत पण अजून असं काही फिक्स झालं नाही आहे. वरुणने असं म्हटलं आहे की, सध्या जगात विचित्र परिस्थिती आहे. यावर्षी परिस्थितीत सुधारणा होईल, तेव्हा आम्ही लग्न करू शकतो.