

स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या 'डाॅ.बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत बाबासाहेबांच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे पाहायला मिळतायत. आता रंगणार आहे बाबासाहेब आणि रमाबाई यांचा विवाहसोहळा.


भीवा १४ वर्षांचा आणि रामी ९ वर्षांची असताना दोघं विवाहबंधनात अडकले. हा ऐतिहासिक प्रसंग मालिकेतून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.


त्याकाळी लग्नाआधी वधुवराची गाठभेट होत नसे. रमाबाईंनीही भीमरावांना पाहिलं नव्हतं. त्याच्या मनात अपार उत्सुकता होती.


अगदी उखाण्यापासून, गृहप्रवेश, नव्या घरात जुळवून घेण्याचा रामीचा प्रयत्न हे भावनिक प्रसंग मालिकेतून पहायला मिळतील. मृण्मयी सुपाळ या मालिकेत बालपणीच्या रमाईंची भूमिका साकारतेय.


१९०७ साली रमाबाई आणि भीमरावांचा विवाह सोहळा भायखळा येथील मासळी बाजारात पार पडला. तो काळ आता मालिकेतून पाहता येईल.


बाबासाहेबांच्या विवाहाप्रसंगी तुफान पाऊस असल्याचा संदर्भ काही पुस्तकांमध्ये आहे. योगायोग असा की शूटिंगच्या वेळीही जोरदार पाऊस होता. पण शूटिंग व्यवस्थित झालं.


डाॅ. आंबेडकरांच्या प्रत्येक आंदोलनाच्या वेळी रमाबाई त्यांच्या पाठी उभ्या राहिल्या. आता मृण्मयी ही भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेतेय. मुख्य म्हणजे मालिकेतली बोलीभाषा शिकतेय. तशी देहबोली शिकतेय.


सागर देशमुख डाॅ. बाबासाहेबांची भूमिका साकारणार आहे, तर मोठ्यापणीच्या रमाबाई साकारतेय अभिनेत्री शिवानी रांगोळे.