इलियाना डिक्रूज ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
2/ 10
मै तेरा हिरो, रेड, बरफी, किक, येवडू यांसारख्या अनेक सुपरहिट हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.
3/ 10
चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील चर्चेत असते. सध्या तिचे खरेदी करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4/ 10
इलियानानं गुड फ्रायडे या सणाच्या निमित्तानं थोडी शॉपिंग केली. पण लक्षवेधी बाब म्हणजे तिला खरेदी करताना पाहण्यासाठी चाहत्यांनी दुकानासमोर गर्दी केली होती.
5/ 10
वाढत्या कोरोनामुळं गर्दी करण्यास बंदी घातली आहे मात्र कोरोनाची फिकिर न करता चाहते आपल्या आवडत्या अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी दुकानासमोर ताटकळत उभे होते.
6/ 10
तिनं वांद्रे येथील एका दुकानात खरेदी केली.
7/ 10
अखेर वाढती गर्दी पाहून स्वत: इलियानेच खरेदी थांबवली अन् ती आपल्या गाडीत बसून लगेचच निघून गेली. परंतु या दरम्यान चाहत्यांनी तिचे काही फोटो काढले.
8/ 10
इलियानाने गुड फ्रायडेच्या निमित्तानं केक आणि गिफ्ट खरेदी केले. हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
9/ 10
इलियाना अलिकडेच अभिषेक बच्चनच्या द बिग बूल या चित्रपटात झळकली होती.
10/ 10
या चित्रपटात तिनं सुचिता दलाल ही महत्वाची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिची प्रचंड स्तुती करण्यात आली.