

बॉलिवूड कलाकार नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्याशी कनेक्टेड राहतात. त्यासाठी इन्स्टाग्राम हे सध्या सर्वाधिक लोकप्रिय असं माध्यम ठरलं आहे. मात्र यामुळे अनेकदा ते अडचणीतही येतात. अभिनेत्री इलियाना डिक्रुझसोबतही काहीसं असंच घडलं.


इलियानानं तिच्या चाहत्यांसाठी नुकताच एक प्रश्नोत्तरांचा सेशन ठेवला होता. ज्यामध्ये युजर्सना तिला कोणताही प्रश्न विचारण्याची मुभा होती.


मात्र असं करण तिला अडचणीत आणणारं ठरलं. इन्स्टाग्रामवरील 'आस्क मी एनिथिंग' (Ask Me Anything) या सेशनमध्ये एका युजरनं इलियानाला तिच्या वर्जिनिटीबाबत प्रश्न विचारला.


इन्स्टाग्रामवरील 'आस्क मी एनिथिंग' (Ask Me Anything) या सेशनमध्ये एका युजरनं इलियानाला तुझी वर्जिनिटी ब्रेक कधी झाली असा प्रश्न विचारला. सार्वजनिक ठिकाणी असा प्रश्न विचारणं खरं तर चुकीचं आहे.


मात्र या प्रश्नामुळे इलियाना गडबडली नाही. उलट तिनं या युजरला चांगलाच धडा शिकवला. तिनं त्याच्या प्रश्नचं उत्तर देणं टाळलं नाही तर तिनं त्याला सडेतोड उत्तर दिलं


इलियाना या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाली, 'तुझी आई काय म्हणेल?' यावर त्या युजरनं शांत राहणंच पसंत केलं. इलियानाच्या या उत्तरामुळे सध्या सोशल मीडियावर तिचं कौतुक केलं जात आहे.


अशा प्रकरचा वर्जिनीटीबाबत प्रश्न विचारला गेलेली इलियाना पहिलीच बॉलिवूड सेलिब्रिटी नाही. याअगोदर अभिनेता टायगर श्रॉपला सुद्धा एका युजरनं तू वर्जिन आहेस का असा प्रश्न विचारला होता.