

भारतानं ICC World Cupमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवत मिशन वर्ल्डकपला सुरुवात केली. दरम्यान या सामन्यात रोहित शर्मानं शतकी खेळी करत सर्वांची मनं जिंकली. पण या सगळ्यात चर्चा झाली ती धोनीच्या ग्लोव्ह्जची. भारताच्या गोलंदाजी दरम्यान यष्टीरक्षण करताना धोनीच्या ग्लोव्ह्जवर एक खास चिन्ह दिसून आले. हे चिन्ह होते, पैरा स्पेशल फोर्सचे. या चिन्हाला बलिदान चिन्हही म्हटले जाते. आतापर्यंत कोणत्या खेळाडूनं लष्काराचे चिन्ह सामन्या दरम्यान वापरले असा प्रकार क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कधीच घडला नाही. यामुळं धोनीचं कौतुक केलं जात आहे. मात्र आता या प्रकरणावरून वादंग सुरू झाला आहे.


दरम्यान, या सगळ्या महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्या अफेअरच्या चर्चांबद्दल ही बोललं जात आहे. आतापर्यंत त्याचं नाव कोणत्या अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.


स्वाती- १२ वीत असताना धोनीचं त्याच्या वर्गमैत्रीणीवर एकतर्फी प्रेम होतं. दोघं एकाच वर्गात शिकायचे. एका कार्यक्रमात धोनीने सांगितलं होतं की, १२ वीत असताना त्याचं स्वाती नावाच्या मुलीवर क्रश होतं.


प्रियांका झा- महेंद्र सिंग धोनीच्या बायोपिकमध्ये प्रियांका झा नावाच्या मुलीचा उल्लेखही केला आहे. सिनेमात प्रियांकाची व्यक्तिरेखा दिशा पाटनीने साकारली होती. धोनी जेव्हा क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी परदेशात गेला होता तेव्हा प्रियांकाचा भारतात अपघाती मृत्यू झाला होता.


दीपिका पदुकोण- एक वेळ अशी होती जेव्हा दीपिकाचं नाव युवराज सिंग आणि त्यानंतर महेंद्रसिंग धोनीसोबत जोडलं गेलं. दीपिका आणि माही एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र दोघांनी याबद्दल कधीही वाच्यता केली नाही.


राय लक्ष्मी- एकेकाळी धोनी आणि लक्ष्मी यांच्या नात्याबद्दल खूप बोललं आणि लिहिलं गेलं. मीडिया रिपोर्टनुसार, २००८ मध्ये आयपीएलदरम्यान धोनी आणि लक्ष्मीची ओळख झाली. तेव्हापासून ते एकमेकांना डेट करत होते. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. अवघ्या वर्षभरात दोघं एकमेकांपासून वेगळे झाले.


असीन- बॉलिवूड अभिनेत्री असीनचं नावंही धोनीशी जोडलं गेलं होतं. २०१० मध्ये दोघं एका ब्रँडचे एम्बेसेडर होते. या दरम्यान, २०१० मध्ये आयपीएल सामन्यांमध्येही धोनीसोबत आसीनला पाहण्यात आले होते.