बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत दिसलेल्या तरुणी सचदेव हिला अनेक लोक आजही रसना गर्ल या नावानेही ओळखतात. या जाहिरातीशिवाय तरुणी 50 पेक्षा अधिक अधिक व्यावसायिक अॅड्समध्येही दिसली होती. लहानग्या तरुणीने स्वतःची एक ओळख निर्माण केली होती. तिला वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत जेवढी प्रसिद्धी मिळाली होती, ती मिळवण्याासाठी अनेकांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते.