'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे नुकतंच लग्नबंधनात अडकली आहे. 18 मे रोजी हृताने बॉयफ्रेंड दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत मुंबईत लग्नगाठ बांधली आहे. त्यांनतर आता अभिनेत्री हनिमून साजरा करत आहे. हृता सध्या टर्कीमध्ये आहे. याठिकाणहून ती सतत आपले सुंदर फोटो शेअर करत आहे. नुकतंच अभिनेत्रीने पती प्रतीकसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये हृता आणि अजिंक्य एअर बलूनमध्ये बसलेले दिसत आहेत. हृताने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले हे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. हृताचा पती प्रतीक हिंदीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्याने अनेक हिंदी मालिकांच दिग्दर्शन केलं आहे.