हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेजनं आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच वेड लावलं आहे. 51 वर्षांची जेनिफर लोपेज आज सुद्धा तितकीच तरुण आणि सुंदर दिसते. जेनिफरचे हॉट आणि बोल्ड फोटो आजही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. 51 व्या वर्षीसुद्धा जेनिफर लोपेज अतिशय अॅक्टिव्ह आहे. जेनिफर लोपेज नुकताच आपला जोडीदार एलेक्स रोड्रीजपासून विभक्त झाली आहे. 'द बॉय नेक्स्ट डोअर' आणि 'सेलेना'सारख्या चित्रपटात जेनिफरनं उत्तम अभिनय केला आहे. जेनिफर लोपेज सोशल मीडियावर सुद्धा बरीच अॅक्टिव्ह असते. जेनिफर लोपेज सतत आपल्या हॉट फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. जेनिफर लोपेजच्या फोटोंना सोशल मीडियावर मोठी पसंती मिळत असते. इन्स्टाग्रामवर सुद्धा जेनिफर लोपेजचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक फोटोवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतं असतो.