'मी उठले तेव्हा त्याच्या पलंगावर होते'... हॉलिवूड अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप
इटालियन अभिनेत्री आणि दिग्दर्शक एशिया आर्गेंटोने केलेल्या सनसनाटी आरोपांमुळे कास्टिंग काऊचचा वाद पुन्हा उफाळून वर आला आहे. The Fast and the Furious च्या दिग्दर्शकावरच्या आरोपांमुळे हॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.


कास्टिंग काउचचा वाद प्रत्येक सिनेक्षेत्रात नेहमीच असतो. हॉलिवूड ते टॉलीवूड या वादावर #Metoo नावाची मोठी चळवळ झाली होती. पण ताज्या कास्टिंग काउचचा वाद हॉलिवूडला हादरा देत आहे तो म्हणजे इटालियन अभिनेत्री आणि दिग्दर्शक एशिया आर्गेंटो यांनी केलेल्या सनसनाटी आरोपामुळे. ((Photo Credit : Instagram))


The Fast and the Furious चे दिग्दर्शक रॉब कोहेनवरील तिच्या आरोपामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. तिचा असा दावा आहे की चित्रपट दिग्दर्शक रॉब कोहेनने 2002 मध्ये तिला XXX चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक ड्रिंक पाजून तिच्यावर बलात्कार केला होता. (Photo Credit: Instagram)


XXX सिनेमाच्या शूटिंग वेळी कोहेनने मला एक कोल्ड ड्रिंक जबरदस्तीने प्यायला भाग पाडले. मी ते कोल्ड ड्रिंक प्यायलं पण त्यात अंमली पदार्थ होते. मला जेव्हा जाग आली तेव्हा मी कपड्यांशिवाय त्याच्या पलंगावर होते " असे एशियन अर्जेंटोने एका इटालियन मासिकाला सांगितले. (Photo Credit : Instagram)


मात्र कोहेनच्या प्रवक्त्याने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "आशिया अर्जेंटोने केलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत. दोघांचे चांगले कामाचे संबंध आहेत. आणि कोहेन तिला चांगली मैत्रीण मानतात." (Photo Credit : Instagram)


'Biography Anatomy of a Wild Heart' ही बायोग्राफी उद्या इटलीमध्ये प्रसिद्ध होईल. यात आशिया अर्जेंटोची बायोग्राफी सुद्धा समाविष्ट आहे. (Photo Credit : Instagram)


यापूर्वी सुद्धा रॉब कोहेनवर लैंगिक छळाचा आरोप आहे. त्यांच्या मुलीनेही कोहेनवर खळबळजनक आरोप करत सांगितलं की तिचे वडील रॉब कोहेन यांनी लहान असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. तथापि, दोन्ही प्रकरणांमध्ये रॉब कोहेनने दोषी नसल्याचे सांगितले आहे.(Photo Credit : Instagram)