

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) सध्या पठाण सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमासाठी त्याने तब्बल 20 कोटींचं मानधन घेतलं आहे. पठाण सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहे. या सिनेमामध्ये शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पादुकोणही (Deepika Padukone) काम करत आहेत.


जॉन लवकरच डिलिव्हिरी बॉयला आपल्या सिनेमात काम देणार आहे. हा डिलिव्हरी बॉय दुसरा तिसरा कोणी नसून हर्षवर्धन राणे आहे. हर्षवर्धन राणे आणि जॉनची भेट 16 वर्षांपूर्वी दिल्लीत झाली होती. त्यावेळी हर्षवर्धन स्ट्रगल करत होता. हर्षवर्धन दिल्लीत डिलिव्हरी बॉयचं काम करत होता.


2004 साली हर्षवर्धन राणे एका हेल्मेटची डिलिव्हरी घेऊन जॉनकडे गेला होता. पण त्यावेळी हर्षवर्धनला जॉनबद्दल माहिती नव्हती. हळूहळू त्यांची ओळख वाढली आणि आता त्यांच्या मैत्रीला 16 वर्ष झाली आहेत.


हर्षवर्धन राणेनी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. ‘सनम तेरी कसम’ (Sanam Teri Kasam) या चित्रपटामधून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. हर्षवर्धन आणि जॉनच्या चित्रपटाचं नाव 'बोले तो तारा रा रा' असं आहे. या सिनेमाचं शूटिंग पुढच्या वर्षी मार्च महिन्यात सुरू होणार आहे.