तुझ्यात जीव रंगला फेम राणा आणि अंजली म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दीक जोशी यांनी खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधली.
2/ 14
पुण्यात दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला.
3/ 14
मेहंदी, हळदी, लग्न ते रिसेप्शनपर्यंत सगळे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
4/ 14
हातमागावर विणलेले दोघांचे कपडे, पारंपरिक दागिने, मराठमोळा साज या सगळ्यानं सर्वांचं लक्ष वेधलं.
5/ 14
अक्षया आणि हार्दीक यांच्या साखरपुड्यानंतर दोघे लग्न कधी करणार? कसं करणार? कुठे असणार या सगळ्याची सर्वांना उत्सुकता लागून होती.
6/ 14
अखेर दोघांनी 2 डिसेंबरला लग्न केलं. दोघांच्या सुखी आयुष्याला सुरूवातही झाली आहे.
7/ 14
हार्दीकच्या घरी आलेल्या अक्षयानं सत्यनारायणाची पूजा करून संसाराला सुरूवातही केली आहे.
8/ 14
हळद झाली,लग्न झालं, रिस्पेशन, गृहप्रवेश, सत्यनारायणही घालून झाला. आता हार्दीक आणि अक्षया हनिमूनला कुठे जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
9/ 14
अक्षय हार्दीकच्या हनिमूनसाठी काही ठिकाणं समोर आली आहेत.
10/ 14
हार्दीक अक्षया यांच्याआधी नवी लग्न झालेली हृता दुर्गुळे हनिमूनसाठी तुर्कीच्या इस्तानबूल येथे गेली होती.
11/ 14
तर बिग बॉस फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तिचा नवरा मालदिव येथे गेले होते.
12/ 14
तसंच गोठ फेम अभिनेत्री रुपल नंद सिक्रेट हनिमून डेस्टिनेशनवरून फोटो शेअर करत होती. इतकंच नाही तर हार्दीकच्या दुसऱ्या मालिकेतील नायिका अमृता पवार लग्नानंतर लोणावळ्याला फिरायला गेली होती.
13/ 14
हार्दीक आणि अक्षया हे लग्नानंतर हनिमूनसाठी कोणत्या ठिकाणी जाणार याची अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.
14/ 14
पण इतर सेलेब्सच्या हनिमून डेस्टिनेशनवरून मालदिव, स्विल्झर्लंड, तुर्की या ठिकाणी राणा आणि अंजली फिरायला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.